Submission of application form, will be starting from 12/01/2026, 10:00 AM.
अर्ज भरण्याची प्रक्रिया 12/०१/२०२६, सकाळी १०:०० वाजेपासून सुरू होईल.
पोलीस पाटील भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचुनच ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पध्दतीनेच भरलेले अर्ज व विहित पध्दतीने भरलेल्या परीक्षा शुल्कासह ग्राहय धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रियेची माहिती बाबत अदयावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल. भरती प्रक्रिया / परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशता बदल करणे, पदाच्या एकुण गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट तसेच आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पोलीस पाटील निवड समिती यांना राहील.